रायपूर : छत्तीसगड सरकार मोठ्या प्रमाणावर शेण खरेदी करणार असून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज हरेली सणाच्या मुहूर्तावर गोधन न्याय योजनेला सुरुवात केली आहे. अशाप्रकारचा आगळावेगळा निर्णय घेणारे छत्तीसगड देशातील पहिले राज्य ठरले आहे. माहितीनुसार, सरकार पशुपालकांकडून 2 रुपये किलो दराने शेण खरेदी करणार आहे. या शेणाच्या मदतीने जैविक खत तयार केले जाणार आहे. पशुपालनाला प्रोत्साहन देणे आणि शेतजमिनीचा कस …
Read More »पंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…देशाच्या राजकारणात मागील तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 …
Read More »मारा कपाळावर हात, चक्क बँकेची बनावट शाखा
चेन्नई : तामिळनाडू राज्यात कुडलूर जिल्ह्यातील परूती येथे चक्क स्टेट बँक आॅफ इंडिया अर्थात एसबीआयची बनावट शाखा चालवण्यात येत होती. या प्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी कर्मचाºयाचा मुलगा मुख्य आरोपी कमल बाबू हा अवघा 19 वर्षांचा आहे. त्याने त्याच्या संपर्कातील लोकांच्या मदतीने एसबीआयची शाखा सुरू करण्यासाठी संगणक, लॉकर, चालान आणि बनावट कागदपत्रे …
Read More »हेही वाचा : विकास दुबेचा प्रवास शुक्रवार ते शुक्रवार
नवी दिल्ली : मागील शुक्रवारी (3 जुलै 2020) पोलिसांवर भ्याड करून पळालेला विकास दुबे यांने आज पुन्हा शुक्रवारीच पोलिसांवर पिस्तुल ताणून पळण्याचा प्रयत्न केला़ मात्र, एन्काऊंटरमध्ये त्याला ठार मारण्यात आले. विकास दुबेला पकडण्यासाठी शुक्रवारी, 3 जुलै 2020 रोजीच्या रात्री पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. पोलिस पोहचल्याची माहिती मिळाल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलिस …
Read More »सीबीएसई विद्यार्थ्यांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई [CBSC] इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम चालू अर्थात 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी सुमारे 30 टक्के कमी करण्यात येणार असून महत्त्वाचा भागच अभ्यासक्रमात असेल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचे …
Read More »चीनला ९०० कोटींचा झटका, हिरो सायकल चालली ‘या’ देशात
नवी दिल्ली: देशातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबत केलेली तब्बल ९०० कोटींचा मोठा करार रद्द केला आहे. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवरील तणाव आणि या तणावरून २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनची आर्थिक नाकेबंदी सरकारने सुरू केली आहे. अशातच हिरो सायकलने चीनवर बहिष्कार टाकत मोठा निर्णय घेतला आहे. हिरो सायकलने चिनी कंपनीशी केलेला ९०० कोटींचा व्यवहार रद्द केला आहे. हा व्यवहार …
Read More »जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलल्या
नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई [JEE] आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी एनईईटी [NEET] या दोन्ही परीक्षांची तारीख दुसºयांदा पुढे ढकलली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. नीटची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबरला होणार आहे. 18 ते 23 जुलै रोजी नियोजित असलेली जेईई मुख्य परीक्षा आता 1 ते …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये
नवी दिल्ली :भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये पोहोचले. …
Read More »वीज कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू
पाटणा : बिहारमधील आठ जिल्ह्यांत वादळ व पाऊस पडल्यामुळे वीज पडल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात पाच, पूर्व चंपारणमध्ये चार, समस्तीपूर तसेच कटिहारमध्ये प्रत्येकी तीन, पुरी, मधेपुरा आणि अन्य एका ठिकाणी प्रत्येकी दोन, तर पश्चिम चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उल्लेखनीय आहे की 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने 96 …
Read More »प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका यांना बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. 6-बी हाऊस नंबर- …
Read More »