Breaking News

जुनी पेन्शन देणाऱ्यालाच मतदान, संघटना आक्रमक

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य अशी रॅली काढण्यात आली .यावेळी भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे रूपांतर नंतर छोट्या सभेत झाले. यावेळी ‘जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्यांनाच आम्ही मतदान करु’, असा इशारा यावेळी कर्मचारी संघटनांनी दिला.

या आंदोलनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. तर सर्व आंदोलनात एकच घोषणा देण्यात येत होती भडकल गेटवरून शेकडो कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Advertisements

‘एकच मिशन जुनी पेन्शन’

Advertisements

जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन पासून वंचित ठेवण्यात येत आहे.त्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांची संघटना संख्या 19 लाख इतकी आहे.प्रत्येक कुटुंबात चार जण याप्रमाणे 76 लाख मतदार राज्यात आहेत.त्यामुळे आगामी लोकसभेला जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्याच सरकारला आम्ही मतदान करणार असल्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटना तसेच इतर संघटनांनी दिला.

तलाठी संघटनेचा सहभाग

रामहाराष्ट्र ज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने तलाठी आणि कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते. राज्यातल्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन ही मिळालीच पाहिजे. मग तो सरकारी असो कंत्राटी असो ज्याने सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाचे पगार घेतलेला असेल त्या सर्वाला पेन्शन मिळाली पाहिजे अशी मागणी संघटनेने केली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

नागपूर हायकोर्टाने अधिकाऱ्यांवर का ठोठावला 50 हजारांचा दंड?

वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याला अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंदियामधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *