Breaking News

धनुष्यबाण कुणाचे? आज फैसला

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाला मिळावा, यासाठी शिंदे आणि उद्धव ठाकरे गट एकमेका विरुद्ध उभे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात या संदर्भात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये शिंदे गटाने सादर केलेल्या पुराव्यावर निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत काय निर्णय घेते? का फक्त सुनावणी करते? हे निश्चित होणार आहे. दोन्ही गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये युक्तिवादही करणार आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे.

Advertisements

सुनावणीआधी शिंदेंचा अर्ज

Advertisements

निवडणूक आयोगाच्या या सुनावणीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला 1,50,000 प्रतिज्ञापत्रासह अर्ज केला आहे. या अर्जात शिंदेंनी ठाकरे गट धनुष्यबाण या चिन्हाचा गैरवापर करत आहे, तसेच निवडणूक आयोगात कागदपत्रे सादर न करता वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *