Breaking News

गाईला राष्‍ट्रीय प्राणी घोषित करण्‍याची विनंती करणारी याचिका फेटा‍‍‍ळली

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
गाईला केंद्र सरकारने राष्‍ट्रीय प्राणी घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका आज सोमवारी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली.

Advertisements

यावेळी खंडपीठाने गाईला राष्‍ट्रीय प्राणी घोषित करावे यासाठी निर्देश देण्‍याचे हे काम न्‍यायालयाचे आहे का? जिथे आम्हाला वेळ खर्च करावा लागतो. तुमच्‍या कोणत्‍या मूलभूत अधिकारांवर परिणाम झाला आहे, तुम्‍ही कशासाठी न्‍यायालयात आला आहात? असे सवाल करित यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्या गोवंश सेवा सदनला फटकारले.

Advertisements

गाईला राष्‍ट्रीय प्राणी घोषित करावे यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्‍यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका स्‍वंयसेवी संस्‍था गोवंश सेवा सदनने सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अभय एस ओका यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना! परंतु रामाचरण का अभाव 

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना परंतु रामाचरण का अभाव   टेकचंद्र …

शासकीय रुग्णवाहिकेला ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *