Breaking News

सत्तेसाठी उद्धवजींनी शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला : भाजपची टीका

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवले.त्यानंतर भावनिक भाषण करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली. तसेच भाजपवरही त्यांनी निशाणा साधला. इतकेच नव्हे तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही पाच हजार वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंसारखा दानव झाला नाही अशी टीका करण्यात आली आहे. या सगळ्याला आता भाजपने उत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या सगळ्याबाबत फेसबुक पोस्ट लिहित उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला,अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

Advertisements

काँग्रेसकडून वीर सावरकरांचा अपमान

Advertisements

काँग्रेसकडून होणारा वीर सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन केलात, सत्तेच्या कैफात स्वाभिमानी आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दहशतवाद्यांशी साटेलोटे असलेल्या नवाबाच्या मांडीला मांडी लावून बसलात. राज्यातील जनता महामारी, अतिवृष्टी, वादळामुळे हतबल झाली असताना भ्रष्टाचारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिलेत, आणि सत्तेचे सोने करून महाराष्ट्राला मोठे करण्याऐवजी घरात बसून स्वतःभोवती आरती ओवाळणाऱ्यांची टोळी तयार केलीत.

काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला
ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी मी हे दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हा तुम्ही खूप लहान होतात. पण बाळासाहेबांची तीच भावना कायम होती. आजही बाळासाहेबांचे शिवसेनेवर लक्ष आहे. त्या दिवशी त्यांच्या स्मृतीस्थळावरची ज्योत थरथरली तेव्हाच हे स्पष्ट झाले असे तुम्ही मानत असाल, तर शिवसेनेची वाताहत ही बाळासाहेबांनी तुम्हाला दिलेली शिक्षा आहे, असे समजा. काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला, म्हणून त्यांच्या इच्छेमुळेच तुमचे दुकान बंद होत आहे, म्हणून जे काही घडत आहे, त्याला तुम्हीच जबाबदार आहात!

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नितीन गडकरी प्रचार नही करेंगे?भाषण के दौरान चक्कर

भाषण के दौरान केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी को चक्कर आया और बेहोश होकर गिर पड़े? …

CM एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे को बड़ी चेतावनी, ‘अगर मै बोलूंगा तो…’

सीएम एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे को बड़ी चेतावनी, ‘अगर मै बोलूंगा तो…’ टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *