विश्व भारत ऑनलाईन :
अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे महत्वाचे आहे, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले. आता फडणवीस यावर काय उत्तर देणार? हे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.