Breaking News

अभिनेत्री एंड्रिला शर्माचे 24 व्या वर्षी ब्रेन स्ट्रोकने निधन

Advertisements

बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले.तिने वयाच्या २४ व्या वर्षी कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एंड्रिलाच्या निधनाने बंगाली, बॉलिवूडसह अनेक कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. अलीकडेच तिला कॅन्सरचे निदानही झाले होते.

Advertisements

अभिनेत्री एंड्रिला शर्माची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. एंड्रिला १५ नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या. यानंतर त्या कोमात गेल्यामुळे डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. याआधी १ नोव्हेंबर रोजी तिला हद्यविकाराचा झटका आल्यानंतर तिची प्रकृती ढासळली होती. या आजारातून ती लवकर बरी होण्यासाठी कुटूंबियानी खूपच पैसा खर्च केला होता. मात्र, आज त्याची कोलकाता येथील रुग्णालयात प्राणजोत मावळली. एंड्रिलाच्या निधनाने चाहत्यांसह सर्व स्टार्संना धक्का बसला आहे.

Advertisements

टीव्ही शो,सोशल मीडियावर सक्रिय

एंड्रिला शर्माने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिने २००७ मध्ये ‘झूमर’ या टीव्ही शोमधून पहिल्यादा पदार्पण केले आहे. यानंतर तिने ‘जीवन ज्योती’, ‘जिओं काठी’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली. तर एंड्रिलाचे सोशल मीडियावर खूपच फॅन-फॉलोव्हर्स आहेत. एंड्रिला सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो पाहायला मिळतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अभिनेत्री लारा दत्ता दिसतेय ‘म्हातारी’ अन् ‘जाड’!

मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ता सध्या तिच्या आगामी ‘स्ट्रॅटेजी: बालाकोट अँड बियॉन्ड’ या वेब …

तब्बू होती 10 वर्ष रिलेशनशीपमध्ये : तरीही अविवाहित

अभिनेत्री तब्बू वयाच्या 52 व्या वर्षी देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. नुकताच अभिनेत्री ‘क्रू’ सिनेमाच्या माध्यमातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *