✍️मोहन कारेमोरे
नागपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग,मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन केले. समृद्धी महामार्ग बांधकामात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका आहे. तितकीच नितीन गडकरी यांचीही.
मात्र, नरेंद्र मोदी यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान दिसले. मात्र, गडकरी यांच्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काळात शिंदे आणि फडणवीस यांचे वजन वाढणार आहे. ते रस्त्याचे जाळे आणखी घट्ट करताना दिसून येईल, यात काही शंका नाही. मोदी यांनी गडकरी यांच्याकडे लक्ष न दिल्याने चर्चाना उधाण आले आहे.
विश्वभारत News Website