Breaking News

पंकजा मुंडेंना मोठा धक्का ; नड्डांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

Advertisements

2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाले. जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

Advertisements

नुकत्याच बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारली होती. याची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता पंकजा यांना भाजप पक्षश्रेष्ठींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे या मराठवाड्यातील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणे अपेक्षित होते. परंतु, पंकजा मुंडे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. याचा फटका निवडणुकीत भाजपला बसू शकतो.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *