Breaking News

बेकायदा बांधकामाला पाठबळ : सहायक आयुक्त निलंबित

Advertisements

बेकायदा बांधकामावरील कारवाई करण्यासाठी ज्या दिवशी यंत्रणा उपलब्ध करून दिली होती, त्याचदिवशी ठाण्यातील दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दुसऱ्यादिवशी त्यांनी कारवाई सुरु केली पण, ती केवळ दिखाव्यापुरतीच होती. या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.तरीही त्यांच्याकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

Advertisements

काय आहे प्रकरण?

Advertisements

दिवा भागात भुमाफियांकडून उभारण्यात येत असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईच्या निमित्ताने बेकायदा बांधकामाला अभय दिले तर निलंबनाची कारवाई होईल, असाच संदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी इतर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे चित्र असून यामुळे बेकायदा बांधकामावरील कारवाईला वेग येण्याची चिन्हे आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *