Breaking News

शिंदे-फडणवीसविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट : नागपुरात तरुणावर गुन्हा, भाजप आमदाराची तक्रार

Advertisements

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्यावरून नागपूर पोलिसांनी मुंबईतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कसबा पोटनिवडणूक संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

आमदाराची तक्रार

Advertisements

नागपुरातील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये सार्थक कपाडी या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईतील रहिवासी असून ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 19 फेब्रुवारी रोजी हे आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले आहे. नागपूर पोलिस सार्थक कपाडीला अटक करणार असल्याची माहिती आहे. कपाडी याने आपल्या ट्विटमध्ये अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. सायबर पोलिसांकडून त्याची माहिती घेतली जात आहे.

सार्थक कपाडी या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते अतुल भातकळकर, आमदार कृष्णा खोपडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आदी नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा प्रकार नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर आमदार कृष्णा खोपडे यांनी रविवारी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो टुक बयान

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो …

नकली शिवसेना का कांग्रेस में विलय होना पक्का? बाल ठाकरे का नाम लेकर भावुक हुए PM मोदी

नकली शिवसेना का कांग्रेस में विलय होना पक्का? बाल ठाकरे का नाम लेकर भावुक हुए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *