Breaking News

अपघातात डॉक्टर पती-पत्नी ठार : कार-ट्रकमध्ये टक्कर

Advertisements

भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (वय 31) व डॉ. अतुल गौरकार (वय 34) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे.

Advertisements

ही घटना वरोरा- भद्रावतीजवळ घडली. ते दोघे आपल्या चिमुकल्या बाळाला घरी आई वडीलाजवळ ठेवून वरोरा येथे स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-34- AM- 4240 ने वरोरा येथे गेले होते.

Advertisements

वरोरा हायवेवर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 ने समोरासमोर जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कार तब्बल अर्धा किलोमीटर ट्रक ने खेचत नेली. या घटनेत डॉ. अश्विनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असल्याने डॉ. अतुल यांना उपचारार्थ हलविण्यात आले. चंद्रपूर ला नेत असताना भद्रावती जवळ डॉ. अतुल यांचा मृत्यू झाला. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचाही स्वभाव मनमिळाऊ होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *