राज्यात 1 एप्रिलपासून वीजदरवाढ लागू केली.त्यामुळे आधीच महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचा खिसा रिकामा होत आहे. RBI EMI, कर्जावरील व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे खिशाला कात्री लागली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. अशातच आता नागपूरकरांना पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
नागपूरमध्ये वीज दरवाढीनंतर आता पाणीपट्टीही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या महिन्यापासूनच हा नियम लागू होणार असल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.