Breaking News

रामभक्त हनुमंताच्या सर्वात उंच मूर्ती : बुलढाण्यातील नांदूऱ्याचाही समावेश

Advertisements

बुद्धी, शक्ती आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय पाहायचा असेल तर ‘श्रीरामभक्त हनुमंता’कडे लक्ष वेधण्यात येते. विद्वत्ता, बलोपासना, शौर्य आणि भक्तीसारख्या असंख्य गुण असलेल्या मारुतीरायाच्या जन्माचा महन्मंगल उत्सव आज देश-विदेशात भक्तिभावाने साजरा होत आहे. देशात आणि परदेशातही मारुतीच्या अनेक उंच मूर्ती आहेत. त्यापैकी भारतातील काही उंच मूर्तींची ही माहिती…

Advertisements

मंडपम हनुमान

Advertisements

देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आंध— प्रदेशातील नरसन्नपेटामधील मंडपमजवळ आहे. या मूर्तीची उंची तब्बल 176 फूट आहे.

दमंजोडी हनुमान

ओडिशातील दमंजोडी येथे ही भव्य मूर्ती आहे. तिची उंची 108 फूट 9 इंच आहे.

परितला आंजनेय

आंध— प्रदेशातच कृष्णा जिल्ह्यात ‘वीर अभय आंजनेय हनुमान स्वामी’ ही मूर्ती आहे. ती देशातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात उंच हनुमान मूर्ती असून तिची उंची 135 फूट आहे.

नांदुरा

महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे 105 फूट उंचीची हनुमान मूर्ती आहे.

अगरा

कर्नाटकातील अगरा येथे ही भव्य मूर्ती आहे. ती 102 फूट उंचीची आहे.

संकटमोचन हनुमान

दिल्लीच्या करोल बागेत ही संकटमोचक हनुमानाची मूर्ती आहे. ती 108 फूट उंचीची आहे.

जाखू सिमला हनुमान

हिमाचल प्रदेशात सिमलामधील प्राचीन जाखू मंदिरात ही मूर्ती आहे. या मूर्तीची उंची 108 फूट आहे.

छतरपूर मंदिर

दिल्लीच्या दक्षिणेस छतरपूर मंदिराच्या आवारात ही मूर्ती असून ती 100 फूट उंचीची आहे.

शाहजहानपूर

उत्तर प्रदेशात शाहजहानपूरमधील हनुमान धामात ही मूर्ती आहे. तिची उंची 104 फूट आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर लगाने की शुरुआत

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर …

(भाग:331) वैदिक सनातन धर्म शास्त्रों में गौ-हत्या के पाप और प्रायश्चित्त का विवरण।

(भाग:331) वैदिक सनातन धर्म शास्त्रों में गौ-हत्या के पाप और प्रायश्चित्त का विवरण। टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *