Breaking News

‘उद्धव ठाकरे बघतो तुला, कसा येतो तर’ : नारायण राणेंचे थेट आव्हान

Advertisements

रत्नागिरीच्या राजापूर येथील प्रस्तावित बारसू रिफायनरीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्यावरून आता एकमेकांचे कट्टर विरोधक राणे आणि ठाकरे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांनी आज सकाळीच उद्धव ठाकरे बारसूत जाणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत ‘उद्धवला आण, बघतो कसा येतो’, असे थेट आव्हानच दिले आहे. या आव्हानानंतर राणे आणि ठाकरेंमध्ये कोकणात वाद पेटण्याची शक्यता आहे.

Advertisements

कोण वैभव नाईक मला गल्लीतल्या माणसाला उत्तर द्यायला आवडत नाही, उद्धव ठाकरेंनी बोलावं, विकासाच्या आड जर कोणी आला तर त्याला मी सोडणार नाही, असा सज्जड दमच नारायण राणे यांनी दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढावा, मी रिफायनरी समर्थनिय मोर्चा काढणार, बघया आपण होऊन जाऊ दे, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.

Advertisements

एअरपोर्टला विरोध, कोणताही प्रकल्प आला की विरोध, कसा कोकणाचा विकास होणार?असा सवाल नारायण राणे यांनी केला. एकावेळी म्हणायचे कोकणाचा कॅलिफॉर्निया करू,त्या कॅलिफॉर्नियात असे 14 प्रकल्प आहेत. आज कोकणी तरूणांना नोकऱ्या पाहिजेत, रोजगार नाहीये असे देखील नारायण राणे यांनी नमूद केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *