Breaking News

नागपुरात उन्हाचा तडाखा : राज्यातील 21 जिल्ह्यांत पारा चाळिशीपार : 2 दिवस उष्णतेची लाट

राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून शुक्रवार (दि.१२) व शनिवारी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने येथे यलो अलर्ट जाहीर केला आहे. गुरुवारी (दि.११) राज्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान जळगाव येथे नोंदविण्यात आहे.

२१ जिल्ह्यांतील पारा चाळिशीपार होता. नाशकात पारा ४०.७ तर मालेगावात ४३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गुरुवारी जळगाव, मुंबई, ठाणे, अकोला, वर्धा, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले होते. तर, नागपूर जिल्ह्यात तापमान वाढले असून अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे घरात ठेवलेल्या कुलरचा उपयोग करण्यासाठी आता नागरिक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

मुंबईसह कोकणात उष्णतेने अस्वस्थता

मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात १० मेपासून ढगाळ वातावरण तसेच कमाल तापमानात दाेन ते तीन अंशाने झालेल्या वाढीमुळे आर्द्रता व उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. तसेच मोचा चक्रीवादळाचे पोर्ट ब्लेअरपासून सुमारे ५०० किमीवर गुरुवारी रात्री अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

तापमान आकडेवारी

जळगाव ४४.८ मालेगाव ४३.६ अकोला ४३.० वर्धा ४३.० जालना ४२.८ नांदेड ४२.८ परभणी ४२.६ बीड ४१.९ सोलापूर ४१.५ अमरावती ४१.४ नागपूर ४१.३ चंद्रपूर ४१.२ बुलडाणा ४१.० यवतमाळ ४१.० गोंदिया ४१.० नाशिक ४०.७ धाराशिव ४०.६ वाशिम ४०.४ सातारा ३९.३ पुणे ३८.८ सांगली ३८.५ कोल्हापूर ३७.१ महाबळेश्वर ३३.५ रत्नागिरी ३४.४

About विश्व भारत

Check Also

जानिए शुगर के मरीजों के लिए चमत्कारी औषधि है मसाला करेला

जानिए शुगर के मरीजों के लिए चमत्कारी औषधि है मसाला करेला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष

नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी। नोव्हेंबरमध्ये होणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *