Breaking News

जिल्हा उपनिबंधक सतिश खरेला 30 लाखांची लाच घेताना अटक : राज्यात रजिस्ट्रीच्या नावावर लूट

Advertisements

नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी 30 लाख रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तसेच खरे यांच्यासह एक वकीलास ताब्यात घेतले आहे.

Advertisements

सतिश भाऊराव खरे (५७, रा. आई हाईट्स, कॉलेज रोड) असे सहकारी संस्थेतील जिल्हा उपनिबंधकाचे नाव आहे. तर , शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड) असे पकडलेल्या वकीलाचे नाव आहे.

Advertisements

नाशिक जिल्ह्यातील एका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकत तक्रारदार संचालक पदी निवडून आले आहेत. मात्र या निकालाविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल आहे. या प्रकरणावर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्याच्या मोबदल्यात खरे व ऍड. सभद्रा यांनी तक्रारदराकडे सोमवारी 30 लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने खरे विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करीत सापळा रचला. खरे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम देण्यासाठी कॉलेज रोडवरील निवासस्थानी बोलवले. त्यानुसार विभागाने सापळा रचला. लाच घेताना सतीश खरे यांना रंगेहाथ पकडले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.विभागाच्या एका पथकाने खरे यांच्या मालमत्तेसह घरझडती घेतली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *