Breaking News

मुंबईतील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची लवकरच होणार बदली : महसूल सचिवांची उचलबांगडी

Advertisements

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांचीही लवकरच बदली करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Advertisements

तर, राज्य शासनाने दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी राजगोपाल देवरा तर नगरविकास विभागाच्या (१) प्रधान सचिवपदी असीम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनातील महसूल आणि नगरविकास या दोन महत्त्वाच्या पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Advertisements

नगरविकास विभाग -१ चा कार्यभार मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडेच होता. आता या पदावर मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी राजगोपाल देवरा यांची नियुक्ती झाली आहे. ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची मदत आणि पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. अनुपकुमार (कृषी व पशुसंवर्धन), राधिका रस्तोगी (पर्यटन), संजय खंदारे (पाणीपुरवठा), एकनाथ डवले (ग्रामविकास), सौरभ विजय (नियोजन) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आर.एस. जगताप यांची यशदामध्ये उपमहासंचालक म्हणून तर जितेंद्र दौदी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

राज्यातील रस्त्यांची कामे ठप्प : कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन सुरु

राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही शासकीय कामांची दीड वर्ष झाली तरी थकीत दयेके मिळत नसल्याने …

कंत्राटदार ७ एप्रिलपासून कामबंद करणार : फडणवीस सरकारवर रोष

जिल्हा पातळीवर केलेल्या शासकीय कामांची देयके गेली १६ महिने मिळत नसल्याने राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी ७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *