Breaking News

‘ईएमआय’ वाढणार?RBI ची महागाईवर मोठी घोषणा

Advertisements

भारतीय रिझर्व्ह बँकने तीन दिवसीय MPC बैठकीतील निर्णय जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या या दुसऱ्या बैठकीतही मध्यवर्ती बँकेने धोरणात्मक दर (रेपो रेट) स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. म्हणजेच ते ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवलेत, त्यामुळे ईएमआय भरणाऱ्यांवर बोजा वाढणार नाही.

Advertisements

६ जून रोजी बैठक सुरू झाली

Advertisements

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ६ जून रोजी सुरू झालेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीचे निर्णय जाहीर केले. यावेळीही रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. मे २०२२ पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचलेल्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने रेपो दरात एकापाठोपाठ एक वाढ केली होती. महागाई अजूनही आमच्या ४ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे आणि आमच्या अंदाजानुसार २०२३-२४ मध्ये त्यापेक्षा जास्त राहील. याबरोबरच त्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जीडीपी वाढ ६.५ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

निर्वाचन आयोग पर हेराफेरी का संदेह : मतदान के अंतिम आंकड़े जारी करने में विलंब

इस आम चुनाव के पहले और दूसरे चरण में कम मतदान के आंकड़े आए, तो …

ड्यूटी पर अनुपस्थित डॉक्टर पर कठोर कार्रवाई की मांग

ड्यूटी पर अनुपस्थित डॉक्टर पर कठोर कार्रवाई की मांग टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिंदवाड़ा।25 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *