Breaking News

आज निवडणुका झाल्या तर?भाजप, काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी किती जागांवर जिंकणार?

Advertisements

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींना सव्वा वर्ष बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आता वेगवेगळे सर्व्हे येऊ लागले आहेत. ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने नुकताच एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष दाखवण्यात आला आहे, तर शिवसेनेसह ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची स्थिती जैसे थेच राहिल तर काँग्रेसच्या जागा वाढतील, असा अंदाज या सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे.

Advertisements

आकडे काय म्हणतात?

Advertisements

न्यूज एरिना इंडियाच्या सर्व्हेनुसार भाजपला महाराष्ट्रात 123 ते 129 जागा मिळतील. राष्ट्रवादीला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय शिवसेनेला 25 आणि ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यानंतर मागच्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत 56 पैकी 40 आमदार गेले तर ठाकरेंसोबत उरलेले आमदार शिल्लक राहिले. या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार आज निवडणुका झाल्या तर एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही धक्का बसू शकतो. एवढच नाही तर काँग्रेस स्वबळावर लढली तर त्यांना फक्त 28 जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *