मोमोज खाण्याच्या पैजेमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये हे प्रकरण उघडकीस आले आहे.
विपिन कुमार पासवान असे या तरुणाचे नाव असून मोमोज खाल्ल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण; चला जाणून घेवू…
काय आहे संपूर्ण प्रकरण?
याबाबत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन शुक्रवारी आपल्या दुकानात बसला होता. यावेळी त्याचे मित्र त्याला मोमोज खायला सोबत घेऊन गेले. त्यांची कोण किती मोमोज खाणार याबाबत पैज लागली होती. यावेळी विपीनने 150 मोमोज खाऊन पैज जिंकली.
यानंतर विपिन त्याच्या दुकानात आला. मात्र दुकानात आल्यानंतर थोड्या वेळात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर बेशुद्ध पडला. घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ठावे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. घटनेने मृत तरुणाच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृताच्या वडिलांनी त्याच्या मित्रांवर विष पाजून हत्या केल्याचा आरोप केला आहे. मोमोजमध्ये विष घालून मुलाला मारल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
विश्वभारत News Website