Breaking News

सोनिया गांधी आणि राहुल गांधी बचावले : विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

Advertisements

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कालपासून कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुत होते. विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी ते बंगळुरुला गेले होते. विरोधी पक्षांची बैठक आटोपून ते परत दिल्लीला निघाले होते. या दरम्यान भोपाळच्या राजा भोज विमानतळावर त्यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. पण एएनआय वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने खराब हवामानामुळे सोनिया गांधी यांच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.

Advertisements

भोपाळमध्ये सध्या वातवरण खराब असल्याने राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे वातावरण पूर्ववत होण्याची वाट पाहत आहेत. भोपाळ विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये ते थांबले आहेत. ते आता इंडिगोच्या फ्लाईटने रात्री साडेनऊ वाजता दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

न्यूज प्रसार सेवा मे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टल न्यूज आगे

न्यूज प्रसार सेवा मे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टल न्यूज आगे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

यूट्यूब-सोशल मीडिया पोर्टल बातम्या वृत्तप्रसारामध्ये आघाडीवर

यूट्यूब-सोशल मीडिया पोर्टल बातम्या वृत्तप्रसारामध्ये आघाडीवर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक.रिपोर्ट मुंबई. यूट्यूब, सोशल मीडिया पोर्टल, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *