Breaking News

37 जणांचा वाचला जीव : एसटी ड्रायवरला सलाम

चालकाला ब्रेक फेल झाल्याची बाब लक्षात येताच त्याने तत्काळ बस थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याने प्रवासी सुखावले.

बुलढाण्याच्या खामगाव वरून सप्तश्रुंगी गडाकडे जाणारी बस मलकापूर येथे आली. या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. या बसमध्ये 37 प्रवासी प्रवास करीत होते. ब्रेक फेल झाल्याचे चालक अमोल केणेकर व वाहक कमल वाघ यांच्या लक्षात आले.

बस सुरु असताना ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी चालत्या एसटी मधून बाहेर उडी मारली. रस्त्याकडेला असलेला मोठा दगड आणून चाकाखाली लावला. त्यामुळे एसटी थांबली.

त्यानंतर तात्काळ बसमधील सर्व प्रवाशांना खाली येण्यास सांगितले. प्रवाशांना बसमधून उतरविल्यानंतर पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. चालकाने एसटी स्थानकात व्यवस्थापकास फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर बस टोचन करून कर्मचा-यांकडून डेपोत आणण्यात आली.

About विश्व भारत

Check Also

एसटी बसचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ

सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. एसटीच्या भाडेदरात शुक्रवारी …

वरिष्ठ नागरिकों के लिए रेल में लोअर बर्थ आरक्षण की सुविधा

वरिष्ठ नागरिकों के लिए रेल में लोअर बर्थ आरक्षण की सुविधा   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *