Breaking News

नागपुरात नागाने घेतला तरुणीला चावा : मध्यरात्रीची घटना

Advertisements

आईसोबत ती झोपली होती.मध्यरात्री पायात काहीतरी कुरकुर चालतंय म्हणून तिला जाग आली. वडिलांनी लाईट लावला तर सर्वांना धक्काच बसला. भला मोठा नाग तेथे होता. काय झाले असावे याची कल्पना सर्वाना आली. तोपर्यंत तिच्या अंगात विष पसरले होते.

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील नेरी मानकर या गावात मयुरी रामोजी धुर्वे, (वय-२०) ही गुरूवारी तिच्या आईसोबत घरात जमिनीवर झोपली होती. रात्री १:३० वाजताच्या सुमारास तिच्या पायाला काहीतरी चावल्यासारखे वाटल्याने तिने तिच्या वडिलांना सदर बाब सांगितली. त्यांनी लाईट सुरु करून बघितले तेव्हा वडिलांना आलमारी खाली मोठा साप दिसला. काही वेळातच मयुरीच्या तोंडाला फेस आल्याने वडिलांनी तिला वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पहाटे ५ वाजता तिला मृत्यू झाला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

तांत्रिक और जादुई पौधा है अपामार्ग-लटजिरा-चिरचिटा

तांत्रिक और जादुई पौधा है अपामार्ग-लटजिरा-चिरचिटा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नई दिल्ली। भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान …

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *