Breaking News

पीडब्लूडी मंत्री रवींद्र चव्हाण झोपेचे सोंग घेऊन जबाबदारी झटकणारे…! रस्त्यांची कामे रखडली

Advertisements

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन मनसे आक्रमक झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्राला मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपले असते तर आमच्यावर दगड भिरकावण्याची वेळच आली नसती. कोकण महामार्गावर अपघातात गेलेले बळी पाहता कोकणातील दगडालाही पाझर फुटेल. पण गेली अनेक वर्षे सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभीमान का जागा झाला नाही.’

Advertisements

‘झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणाऱ्यांना महाराष्ट्रात दगड मारून उठवायची आमची पद्धत आहे. दगड भिर्कावणाऱ्या जनतेचा जेंव्हा कोप होतो तेंव्हा ती खडी फोडायच्याही लायकीची ठेवत नाही, असे प्रत्यूत्तर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलं आहे.

Advertisements

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाले आहे. परंतू या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची पाहणी खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर याच रस्त्यावरुन त्यांनी सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष केले. राज ठाकरे यांच्या टिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *