विधानपरिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेवर बाेचरी टीका केली,त्याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना म्हणाले, पडळकर यांनी अजित पवार यांचेवर जी टीका केली ती संस्कार व संस्कृतीला साेडून आहे. भाजप या विधानाचे कदापी समर्थन करणार नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे संस्कृती असलेले असून विराेधी पक्षाचे साेबत पटत नसेल, एका पक्षात जरी राहून पटत नसेल तर मनभेद प्रदर्शित न करता व्यक्तिगत टिकाटिप्पणी टाळली जाते. पडळकरांच वक्तव्य भाजप संस्कृतीला न शाेभणारे आहे, त्यामुळे याबाबत मी याबाबत दिलगिरी व्यक्त करताे. काेणाचा अपमान करण्याचा अधिकार काेणाला नाही. अजित पवारांचे काही मन दुखले असेल तर मी क्षमा मागताे.
पुणे शहर भाजप नवनिर्वाचित कार्यकारणी बैठकीला बावनकुळे यांनी उपस्थिती लावली. तसेच पुण्यातील मानाचे गणपतीचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी आगामी लाेकसभा निवडणुकीचे बाबतीत बावनकुळे म्हणाले, भाजप या निवडणुकीत चांगल्याप्रकारे यश मिळवेल. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात देश विकास करत असून जागतिक स्तरावर देशाचा मान उंचावलेली आहे. महाराष्ट्रात लाेकसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांना 45 जागा मिळतील असा अंदाज आहे. आगामी निवडणुकीत देशभरात एनडीएच्या बाजूने माेठया प्रमाणात मतदान हाेईल. माेदींचे नेतृत्व देशातील जनतेने मान्य केलेले असून तिसऱ्यांदा ते पंतप्रधान पदाची शपथ घेतील. इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्रित आलेली असून जनता त्यांना नाकारेल.
विश्वभारत News Website