Breaking News

सतत पाठ दुखतेय, हाडांचा वेदनादायी कॅन्सर असू शकतो?डॉक्टरांचा सल्ला घ्या

Advertisements

हाडांचा कॅन्सर हा प्रचंड वेदनादायक असतो. हा एक दुर्लभ प्रकारचा कॅन्सर आहे. इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच याचीही लक्षणे खूप उशीराने दिसू लागतात. हाडांमधील पेशी नियंत्रणाबाहेर गेल्यावर हाडांचा कर्करोग दिसून येतो. या प्रकारचा कॅन्सर सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो त्यामुळं ही चिंतेची बाब आहे. हाडाच्या कर्करोगाची लक्षणेही सामन्य असल्यामुळं त्याकडे फार लक्षही जात नाही. हाडांचा कर्करोग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती हे जाणून घेऊया.

Advertisements

हाडांची गाठ जसजशी वाढत जाते तसतशी ती निरोगी ऊती नष्ट करते आणि हाडे कमकुवत करते. हाड ठिसूळ झाल्यामुळं फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. पाठीचे दुखणे हे देखील हाडांच्या कर्करोगाचे पहिले लक्षण आहे. पाठीत सतत दुखत राहिले तर विशेष म्हणजे पाठीच्या खालच्या भागात दुखत राहिले तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याआधी हाडांच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेऊ…

Advertisements

हाडांमध्ये वेदना जाणवणे, सूज येणे, छोटीशी इजा झाल्यासही फ्रॅक्चर होणे, सांध्यामध्ये वेदना हे हाडांच्या कर्करोगाचे प्रमुख लक्षण आहेत. पण त्याचबरोबर पाठीत वेदना जाणवणे व पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे हे देखील हाडांच्या कॅन्सरचे लक्षणे आहेत. पाठीत वेदना होण्याचे तीन संकेत आहेत. सतत पाठीत दुखत असेल आणि कितीही औषध घेऊनही त्यावर काहीच उपचार नसेल तर तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

पाठीच्या कण्यात वेदना जाणवणे
पाठदुखी होत असेल आणि ती वेदना मणक्याजवळील विशिष्ट ठिकाणी किंवा आसपासच्या भागात होत असेल. तसंच, ही वेदना तीव्र असेल आणि कायम त्याच भागात होत असलेल्या वेदनेमुळं रोजच्या कामात लक्ष लागत नसेल तर आत्ताच डॉक्टरांसोबत संपर्क साधा.

रात्रीच वेदना होत असेल तर
हाडांचा कर्करोग असल्यास रात्री किंवा व्यायाम वा फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी असल्यास जास्त वेदना होतात. तुमची पाठदुखी रात्रीच्या वेळेस जास्त त्रास देत असेल किंवा जखम किंवा मुका मारही लागलेला नसताना वेदना होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे.

गाठ तयार होणे

पाठदुखीबरोबरच हाडांमध्ये सूज येणे किंवा वेदना जाणवणे याबरोबरच पाठीत गाठ तयार होणे हे देखील हाडांच्या कर्करोगाचे एक संकेत आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणाला कॅन्सर असेल तर तुम्हीदेखील या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका. हाडांचा कर्करोग कोणत्यही वयात होऊ शकतो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून …

उशी ठरतेय मान-डोकेदुखीचं कारण

शांत झोप प्रत्येकासाठी आवश्यक असते. पण जर तुम्हाला सकाळी उठल्यावर मानेमध्ये जडपणा, खांदेदुखी, डोकेदुखी किंवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *