Breaking News

मुलीचे अश्लील फोटो व्हायलर? : बाराच्यावर नराधमांनी केला बलात्कार

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा शहरात माणुसकीला काळीमा फासण्याची घटना घडली. देशाचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या अग्नीवीराने एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. तिच्यावर मित्राच्या घरी बोलावून बलात्कार केला. तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्या किमान दहा ते बारा मित्रांनी या मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली. या प्रकरणांत सहा आरोपींना अटक केली असून सहा जण फरार झाले आहे.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार या अग्नीवीराने तिचे अश्लील फोटो काढून चित्रफित तयार केली. पीडित अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व चित्रफित मित्राला दिली. मित्राने अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. शिवाय त्याच्या मित्रांनीही तिच्याशी बळजबरी केली.

Advertisements

खापा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून अग्नीवीरासह पाच आरोपी फरार झाले आहे. प्राप्त माहिती नुसार गोलू लिखार, वेदांत विलास आवते, प्रणय डेकाटे, लिलाधर धर्मेंद्र चौरागडे, निखिल सदाशिव धांदे, सुशील कृष्णा धार्मिक अटकेतील आरोपींची नावे आहेत तर मुख्य आरोपी धीरज हिवरकर, गौरव खुबाळकर, विकास हेडाऊ, स्नेहल सुरकार, लकी धार्मिक, विक्की लिखार अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सदर घटनेतील मुख्य आरोपी धीरज हिवरकर (वय 21, खापा) याची काही दिवसांपूर्वी अग्नीवीर म्हणून नियुक्ती झाली आहे. धीरजने ओळखीच्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. मार्च महिन्यात धिरजने मित्र गोलू लिखार याच्या घरी अल्पवयीन मुलीला बोलावून बलात्कार केला. शिवाय अश्लील फोटो काढून चित्रफित तयार केली. आरोपी धीरज एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने मित्र गोलू लिखार याला अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व चित्रफित दिली.

गोलूने अश्लील फोटो चित्रफित दाखवून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. गोलू व त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल केले. अल्पवयीन मुलीला धमकी देऊन एप्रिल महिन्यात माताखेडी व लांबटपुरा परिसरातील घरात आरोपी गोलू लिखार याचा घरात अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार केला. यादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

या प्रकरणात भांदवि 354 अ, ड, 376 अ, ड, 506, सहकलम 4,6,11,12 पॉक्सो अधिनियम 2012, सहकलम 67 अ, पिटा अ‌ॅक्ट 2000 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *