Breaking News

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याची भेट नाकारली

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार प्राजक्त तनपुरे मुंबईत आले आहेत. काल ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी गेले होते. पण ही भेट होऊ शकली नाही, नेमकं तिथे काय घडलं? याबद्दल आता प्राजक्त तनपुरे यांनी माहिती दिलीय. “अजितदादांकडून काही निरोप नव्हता. मी माझ्या मतदारसंघातील विविध कामांसाठी मुंबईत आलो होतो. मी काही मंत्र्यांना भेटलो सुद्धा. मी दिवसभर मंत्रालयात होतो. अतिवृष्टीचे पैसे आलेले नाहीत. त्या बद्दल मदत आणि पूर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना निवदेन दिलं तसच मतदारसंघातील विविध कामांची निवेदन देण्यासाठी दादांकडे गेलो होतो” असं प्राजक्त तनपुरे म्हणाले.

Advertisements

 

“संध्याकाळी दादा घरी आहेत असं कळलं म्हणून गेलो होतो. त्यावेळी ते आजारी आहेत. दवाखान्यात गेलेत असं सांगण्यात आलं. मला वाटलं घरी भेट होईल, म्हणून थांबलो होतो. नंतर तिथे त्यांच्या आमदारांची बैठक सुरु होणार होती, तेव्हा तिथून निघालो” असं प्राजक्त तनपुरे म्हणाले. दादा देवगिरीवरच होते, त्यांनी भेट नाकारली का? या प्रश्नावर “भेट नाकारण्याइतपत प्रेम कमी झालं नसाव” असं प्राजक्त तनपुरे यांनी उत्तर दिलं. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृतांचा आकडा 35 पर्यंत पोहोचलाय, त्यावर प्राजक्त तनपुरे म्हणाले की, “मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शासन व्यस्त आहे. त्यांना सत्ता टिकवायची आहे. सोयी-सुविधांअभावी राज्यातील जनता मरतेय. खरंतर याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता”

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *