Breaking News

बच्चू कडू भाजपला प्रचंड घाबरले!

Advertisements

एकीकडे आम्हाला सत्तेत या म्हणून सांगणार अन् दुसरीकडे काहीही करुन बच्चू कडूला पाडा, असा आदेश द्यायचा हे काही बरोबर नाही, चंद्रशेखर बावनकुळेंना सांगतो, एक नाही तर 10 खासदार पाठवा, मी निवडणुकीत पडणार नाही, असा थेट इशारा प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. वाशिममध्ये एका दिव्यांग मेळाव्यात मार्गदर्शन करताना बच्चू कडू यांनी भाजपला हा थेट इशाराच दिला.

Advertisements

ठाकरेंना सोडून शिंदेंची दिली साथ
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी त्यांना साथ दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू मंत्री होते, शिंदेंनीही त्यांना मंत्रीपद देतो असं आश्वासन दिलं होतं. पण रखडलेल्या मंत्रिमंडळाच्य विस्तारामुळे बच्चू कडूंना अद्याप मंत्रीपद मिळालं नाही. त्यावर या आधीही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यानंतर त्यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे.

Advertisements

भाजपला थेट मिळाला इशारा
अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपने जोरदार तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत अचलपूरचा आमदार हा भाजपचाच असला पाहिजे या दृष्टीने भाजपने गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू केला आहे. पण बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतरही या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे लपून राहिलं आहे.

त्यांच्या मतदारसंघात घेरणार

बच्चू कडूंना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याच्या भाजपच्या रणनीतीवर त्यांनी अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एकीकडे आम्हाला सांगायचं की, सत्तेमध्ये या आणि दुसरीकडे मित्रत्व पाळायचं नाही हे असं भाजपचं सुरू आहे. काही करून बच्चू कडू पडला पाहिजे यासाठी हालचाली सुरू आहेत. आपण यासंबंधी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सांगितलं होतं की खासदार अनिल बोंडे यांच्याकडे लक्ष द्या म्हणून. आता मी त्यांना सांगतो, एक नव्हे तर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही.

भाजप त्रास देत असल्याचा आरोप

आमदार बच्चू कडूं यांनी मंगळवारी अकोल्यात बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. आपल्या मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपचं आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. मात्र आपण त्याची काळजी करत नसल्याचं बच्चू कडूंनी ठणकावले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *