राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील चार ग्रामपंचायतींना नगर पंचायत, नगर परिषदेचा दर्जा देण्यासाठी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. मात्र, अंतिम अधिसूचना बाकी आहे. यात डिगडोह ग्रामपंचायतीला नगर परिषद, तर निलडोह, कोंढाळी, बिडगाव-तरोडी या तीन ग्रामपंचायती नगर पंचायत होतील.
त्यामुळे येथे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. आता निवडणूक आयोगाने वरील गावात ग्रामपंचायत निवडणूक घ्यावी किंवा नाही, याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणूक घ्यावी किंवा पुढे ढकलावी, यावर निर्णय घेण्याचे सांगितले आहे.
ग्रामपंचायतींना नगर पंचायत आणि नगर परिषदेचा दर्जा देण्याबाबतची अंतिम अधिसूचना एक-दोन महिन्यांत निघाल्यास ग्रामपंचायत बरखास्त होईल. त्यामुळे येथे आता निवडणूक झाल्यास सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द होईल व निवडणुकीवरील खर्चही वाया जाईल, असा दावा केला जात होता.
विश्वभारत News Website