Breaking News

बुलढाण्यात भीषण अपघात : घाटात एसटी बस उलटली; 13 प्रवासी…

Advertisements

बुलढाण्यातील मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली एसटी बस धाड रोडवरील मर्दडी घाटातील वळणावर उलटली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात काही प्रवाशांना जबर मार लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी धाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Advertisements

अपघाताची ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी मलकापूर आगाराची बस पहाटेच्या सुमारास आगारातून निघाली.

Advertisements

या बसमधून १३ प्रवासी प्रवास करीत होते. बस धाड रोडवरील मर्दडी घाटात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत उलटली. सुदैवाने दरीत झाडांची संख्या अधिक असल्याने बस खोल दरीत कोसळली नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *