Breaking News

नागपुरात सायकलच्या गोदामाला आग

Advertisements

नागपुरात गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत सायकल गोदामातील माल जळून भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. शहरातील लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमान नगरातील परफेक्ट सायकल आणि रेक्साइन स्टोअरला आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही.

Advertisements

सायकलचे सुटे भाग, टायर आणि फोमचे हे गोदाम आहे. मुकेश मणिलाल ठक्कर हे या गोदामाचे मालक आहेत. सुमारे 6300 चौरस फुटाचे हे गोदाम असून आगीत गोदाम व सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisements

आगीच्या घटनेत सायकली, रेक्झिन, टायर, फोम, पीक अप वाहन, टीन शेड, आरआरसी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीच्या विस्तार होऊन शेजारच्या प्रकाश कटारिया यांच्या इमारतीचे आणि स्वामी नारायण अपार्टमेंट यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले्. याबाबत निश्चित नुकसान किती झाले याची माहिती मिळाली नाही. एकूण 7 फायर टेंडरव्दारे आग विझविण्यात आली.

दुसऱ्या घटनेत जुना कामठी रोड, कळमना येथील हंसराज अगरबत्ती कारखान्याला आग लागली होती. दाऊद बेग यांचा हा कारखाना आहे. या आगीत भुसा, अगरबत्ती काड्या, कच्चा माल, इलेक्ट्रिक वायरिंग. परफ्यूम लिक्विड, अगरबत्ती मशीन, फॅन, टिनशेड, दोन दुचाकी आदी जळाले. यात अंदाजे 7 लाखांचे नुकसान झाले असून 2 लाखांची बचत झाल्याची माहिती अग्निशमनदलाने दिली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *