Breaking News

नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर देवीचे 24 तास दर्शन : भाविकांसाठी पर्वणी

Advertisements

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवात भाविकांना सप्तशृंगी देवीचे 24 तास दर्शन घेता येणार आहे. सर्व शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत आदींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

Advertisements

नवरात्रीत राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान या कालावधीत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सप्तशृंगगड येथे सप्तशृंगी देवीची दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत दर्शनासाठी 24 तास खुले ठेवून भाविकांना श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Advertisements

दररोज 50 हजार भाविकांची दर्शनासाठी हजेरी

दरवर्षी नवरात्रीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, भाविक यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सप्तशृंगी देवी मंदिर हे 24 तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येत आहे. नवरात्रोत्सव काळात खाजगी वाहनांना गडावर बंदी असणार आहे. नांदुरीगड पायथ्याशी येथे बसस्थानक व वाहनतळ उभारण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव काळात दररोज 40 ते 50 हजार भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे. विविध विभागांनी यात्रा कालावधीत वाटून दिलेली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश प्रांताधिकारी विशाल नरवडे यांनी दिले आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *