सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसराला पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सोमवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी तसेच वित्तहानी झाली नाही.
मात्र, अचानक भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांची धावपळ झाली. मध्यरात्रीच्या सुमारास अनेकजण घराबाहेर पडले. तर काहींनी संपूर्ण रात्र जागून काढली. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात दुसऱ्यांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
त्यामुळे परिसरातील नागरिकांमद्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरण परिसराला पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत.
भूकंपाच्या केंद्रबिंदूबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. ऑगस्ट महिन्यातही साताऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. १६ ऑगस्ट रोजी हा भूकंप झाला होता. मोठा आवाज होऊन जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. आज पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात भूकंप झाला आहे.
विश्वभारत News Website