नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्र्याची मोठ्या प्रमाणात बांग्लादेश येथे निर्यात केली जाते. त्यामुळे बांग्लादेशात जाणाऱ्या संत्रावरील आयात शुल्क हटविणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत संत्रा फळ पिकाचे वयोमर्यादेनुसार कोणतीही दोन वर्षात आंतर मशागती करीता अनुदान देणे. सोबतच सोयाबीन आणि मागील संत्रा फळाचे अनुदान मिळावे याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व संत्रा उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले व जोरदार नारेबाजी केली. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोबत आणलेला संत्रा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या कक्षा बाहेर फेकला.
देश सरकारने शुल्क वाढ केल्याने संत्रा निर्यात जवळपास बंद झाली आहे. नागपुरी संत्र्याकरीता बांग्लादेश हा एकमेव आयात करणारा देश आहे. संत्रा निर्यात झाल्यास स्थानीक बाजारपेठेत शेतकऱ्यांना संत्र्याला बर्यापैकी दर मिळतात. परंतु आता जवळपास निर्यात बंद झाल्याने स्थानीक बाजारपेठेत सुध्दा संत्र्याचे दर मोठ्या प्रमाणात पडले आहे. हवामानातील बदल दरवर्षी वाढती फळगळ उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे आधीच संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तेव्हा संत्रा उत्पादक शेतकन्यांना भरीव मदत करण्याकरीता उस उत्पादक शेतकन्यांच्या साखर नियंतीला देत असलेल्या निर्यातीकरीता अनुदानाच्या धर्तीवर संत्रा निर्यातीकरीता अनुदान द्यावे तसेच मागील संत्रा फळगळीचे अनुदान अजुन पर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. तरी अनुदान मिळण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन प्रहारचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या वेळी कक्षा बाहेर संत्रांचा ढीग संत्रा उत्पादक शेतकन्यांनी मांडला होता व जोरदार नारेबाजी ही यावेळी शेतकन्यांनी केली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्या कारणाने शेतकरी व कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी यांच्या कक्षा बाहेरच पोलिसांनी थांबवले. या वेळी काही वेळ पोलीस व प्रहार कार्यकत्यांमध्ये बाचाबाची ही झाली. आता पडलेल्या पिकांच्या दरामुळे उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही. त्यामुळे सोयाबीन व कापूस पीकाचे शासनाकडून तातडीने खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी ही या वेळी शेतकन्यांनी केली. सदर निवेदन देती वेळी संजय देशमुख, मंगेश देशमुख, प्रदिप खंड, प्रफुल नवघरे, सुभाष मेश्राम, रामदास भोजने, संत्रा व्यापारी तौसिफ़ खान पठाण सह अनेक संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
विश्वभारत News Website