Breaking News

आईस्क्रीममुळे दोन मुलांचा कार अपघातात मृत्यू

Advertisements

मध्यरात्री आयस्क्रीम खाण्यासाठी घराबाहेर पडणे दोन अल्पवयीन मुलांच्या चांगलेच जीवावर बेतले आहे. ठाण्यातील उल्हासनगरमधील दोन युवकांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. पालकांचा हलगर्जीपणाही या घटनेतून समोर आला आहे.

Advertisements

गोल मैदान परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. आईस्क्रीम खाऊन येतो असे बोलून दोन युवक कार घेऊन घरातून निघाले होते. अंबरनाथ पाईपलाईन रोडवर गेले असता स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements

बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास १७ वर्षीय युवक मानव थारवाणी या युवकाने १६ वर्षीय कौशल ठावानी याला आपल्या घराकडे रात्री २ वाजता बोलवून घेतलं. गाडीचा राऊंड मारून आईस्क्रीम खाऊन येऊ, असे बोलून मानवने आपली चारचाकी गाडी काढली.

कारमध्ये बसून दोघे अंबरनाथमध्ये गेले. तिथून ते अंबरनाथ पाईपलाईन रोड येथून जात असताना पाले गाव येथील डी मार्टजवळ स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला जोरात धडकली.

घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेने गोल मैदान परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मात्र पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देणे किती धोकादायक ठरु शकतं, याची प्रचिती यातून आली. त्यामुळे पालकांनी मुलांवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचं आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *