Breaking News

जुनी पेन्शनसाठी वेळ नाही : बियरची विक्री वाढवण्यासाठी समिती

Advertisements

महाराष्ट्रात बियरची विक्री कमी का होते? याचा अभ्यास करुन बियरची विक्री वाढवण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. या समितीत महाराष्ट्र सरकारने चार सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या समितीमध्ये बियर असोसिएशनच्या एका प्रतिनिधीचाही समावेश केला आहे.

Advertisements

मात्र, जुनी पेन्शन सुरु करण्यासाठी अजूनही समितीने निर्णय दिलेला नाही. एकीकडे बियरची विक्री करण्यासाठी समितीची तातडीने समिती स्थापन करण्यात आली. जुन्या पेन्शनसाठी कोणताच खटाटोप सरकारकडून केला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसते.

Advertisements

बिअरवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे बियर विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शासनाला मिळणारा महसूल कमी होत आहे. शिवाय इतर मद्यापेक्षा बियरच्या किमती जास्त असल्याने लोक बिअर पिण्यासाठी उत्सुक नसतात, असा अडचणी बियर उद्योगाच्या प्रतिनिधीने शासनास सादर केल्या आहेत. बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या महसूलात वाढ होण्याच्या दृष्टीने शिफारशी सादर करण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *