Breaking News

दिवाळीत घेतली ५ लाखांची लाच : दोन अधिकारी जाळ्यात

Advertisements

जळगाव जिल्ह्यात आणखी एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. पाच लाखांची लाच घेताना पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍याला एसीबी पथकाने रंगेहात पकडले. रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४, सहायक गटविकास अधिकारी) व पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३, विस्तार अधिकारी) असे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

प्रकरण काय?

Advertisements

जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. या चौकशीत अनुकुल असा रिपोर्ट देण्याच्या बदल्यात त्याला संबंधीत समितीचे अध्यक्ष व सदस्याने तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.

दिवाळी पाडव्याची सुटी असतांना देखील सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३) या पंचायत समितीतील दोन्ही अधिकार्‍यांनी तक्रारदाराला बोलावले होते. येथे पाच लाखांची लाच स्वीकारत असतांना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले. यामुळे सुटीच्या दिवशी लाच घेणे या दोघांना महाग पडल्याचे दिसून आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *