Breaking News

नागपूर रेल्वे स्थानकावर अपघात : दोन प्रवाशी…

Advertisements

रेल्वेची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना नागपूर रेल्वे स्थानकावर बॅटरी कारची धडक बसली. यात दोघे जखमी झाले. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. या अपघातात अकोला येथील रहिवासी आतिफ (२५) आणि एक वृद्ध जखमी झाले. आतिफ यांच्या बहिणीचे बुधवारी सायंकाळी अकोला येथे लग्न होते. त्यासाठी ते मंगळवारी नागपुरात राहणाऱ्या विवाहित बहिणीला घेऊन जाण्यासाठी आले होते.

Advertisements

आज सकाळी आतिफ, त्यांची बहीण, बहिणीचा पती रेल्वेस्थानकावर आले. त्याचवेळी प्रवाशांना फलाट क्रमांक एककडे घेऊन जाणाऱ्या बॅटरी कारने त्यांना धडक दिली. यात आतिफ यांच्या पायाला गंभीर इजा झाली. तसेच, आणखी एक वृद्ध जखमी झाला. रेल्वे कुली संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आतिफ यांना उचलून रेल्वे स्टेशनवरील प्राथमिक उपचार केंद्राला नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना रुग्णालायात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आतिफ आणि जखमी वृद्ध या दोघांनाही मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अकोल्यात बहिणीचे लग्न आणि भाऊ रुग्णालयात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *