राज्यपाल रमेश बैस सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज भंडारा येथील शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास ते उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार भोंडेकर यांनी बोलताना मंचावर उपस्थित सर्वांची नावे घेतली, मात्र माजी आमदार डॉ. परिणय फुके यांचे नाव घेण्यास ते विसरले. आमदार भोंडेकर हे फुकेंचे नाव घेण्यास विसरले की जाणीवपूर्वक त्यांनी ते टाळले, याबाबत कार्यक्रमस्थळी दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली.
जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस आणि पालकमंत्री डॉ. गावित यांच्यासह आमदार आणि खासदारसुद्धा मंचावर उपस्थित होते. आमदार भोंडेकर यांना सर्वप्रथम बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांकडे बघून त्यांची नावे घेतली मात्र समोरच बसलेल्या डॉ. फुके यांचे नाव त्यांनी घेतलेच नाही. ही बाब अनेकांच्या लक्षात आली. यावरून आजी आणि माजी आमदारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगू लागली.
विश्वभारत News Website