Advertisements
छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर येथील बनकरवाडी येथील बारा ते चौदा वर्षे वयाच्या चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (११ जानेवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय १२ वर्षे), अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १४ वर्षे), कुणाल अनिल दळवी (वय १३ वर्षे, चौघे रा. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website