Breaking News

शरद पवार यांना कोण मारणार? टीका करणारे कोण?

Advertisements

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्र सरकार झेड प्लस सुरक्षा पुरविणार आहे. आगामी काळ निवडणूकांचा आहे. राजकीय क्षितिजावर शरद पवार हे जुन्या पिढीचे नेते आपल्या घरातच फूट पडल्याने पुन्हा आपल्या पक्षाची पत मिळविण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा असताना केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्याशी चर्चाविनिय करीत त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करीत टिका केली आहे. मला कळत नाही शरद पवार यांना कोण मारणार आहे ? असा सवाल करीत निलेश राणे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा पुरविली आहे. यासंदर्भात आढावा घेण्यात येऊन त्यांच्या दिमतीला मोठा फौजफाटा नेमण्यात आला आहे.शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवास स्थानी या संदर्भात सीआरपीएफचे अधिकारी आले होते. त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना केंद्रीय सुरक्षा पुरविण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यास शरद पवार यांनी स्वीकारल्याचे म्हटले जात आहे. एसटी संपाच्या वेळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत हा निर्णय घेतला गेला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

RSS की रणनीति : पश्चिम बंगाल मे मिली बीजेपी को बड़ी जीत

RSS की वो रणनीति : पश्चिम बंगाल मे मिली बीजेपी को बड़ी जीत टेकचंद्र शास्त्री: …

सत्ता की दहलीज पर तामिलनाडु CM की रेस में अभिनेता विजय

सत्ता की दहलीज पर तामिलनाडु CM की रेस में अभिनेता विजय टेकचंद्र शास्त्री: 9822550220 चैन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *