Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे कामठी-मौदातून लढणार : ‘विश्व भारत’ची बातमी ठरली खरी

Advertisements

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच कोण कोठून लढणार याचे आराखडे बांधणे सुरू केले आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते त्यांच्या कामठी-मौदा मतदारसंघांतून लढणार नाही, पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणार,असे जाहीर केले आहे.

Advertisements

बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.कोणाचा त्याग किती मोठा आणि महत्त्वाचा आहे, हे मोजण्याची आज गरज नाही. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे आहे तर जास्तीत जास्त आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे महायुतीचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत सत्तेतील काही महामंडळ हे भाजपकडे असावेत असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

Advertisements

बावनकुळे विधान परिषदेचे सदस्य आहेत. कामठीत भाजपचे टेकचंद सावरकर विद्यमान आमदार आहेत २०१९ मध्ये बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे यावेळी बावनकुळे कामठीतून लढणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र बावनकुळे यांनी स्वतः याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले कामठी विधानसभा मतदार संघात उमेदवारी मागितली नाही आणि मागणार नाही. जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणणार. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी सांभाळत राज्यात महायुतीची सत्ता आणणण्यासाठी प्रयत्न केले जाईल. केंद्रीय भाजप नेतृत्व बावनकुळे यांना लढविण्यास उत्सुक असल्याचे दिसते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *