Breaking News

छगन भुजबळ मंत्री असताना निव्वळ पैसे कमवायचा, पुन्हा नव्याने चौकशी करा : मोहन कारेमोरे यांची मागणी

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने समर्थकांना धक्का बसला. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, पक्षाची झालेली अडचण, मुलास विधान परिषदेत पाठवले असताना पुतणे समीर भुजबळ यांची नांदगावमध्ये बंडखोरी, चौकशीत अडकलेली प्रकरणे आदींचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याशी जोडला जात आहे.

भुजबळ यांना अडचणीत आणणारे सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निव्वळ पैसे कमविण्यासाठी छगन भुजबळ यांना मंत्रीपद हवे होते, लोकांच्या विकासाला दुय्यम स्थान देणाऱ्या भूजबळाना मंत्री न केल्याचा निर्णय योग्य आहे, असा दावा कारेमोरे यांनी केला आहे. तसेच नव्याने भुजबळ यांची चौकशी करा, असेही कारेमोरे म्हणाले.

मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी नेते छगन भुजबळांचा समावेश न करता मराठा समाजातील सिन्नरचे आमदार ॲड. माणिक कोकाटे यांना संधी दिली. यातून योग्य तो संदेश दिल्याचे मानले जाते. यासंदर्भात भुजबळांशी संपर्क साधला असता त्यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळण्याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर नंतर भाष्य करू, असे नमूद केले. शरद पवार यांची साथ सोडून भुजबळ हे महायुती सरकारमध्ये सामील झाले होते.

अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि त्यांच्यात संघर्ष सुरु झाल्यानंतर पक्ष अडचणीत आल्याची स्थिती निर्माण झाली. त्याचा लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडला. या परिस्थितीत पक्षाने भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना विधान परिषदेत संधी दिली. तरीेदेखील त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमधून बंडखोरी केली. त्यांना भुजबळांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रसद पुरविल्याचा शिंदे गटाचा आक्षेप होता. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना मिळालेले निर्दोषत्व चुकीचे असल्याचा आरोप शिंदे गटाचे सुहास कांदे यांनी केला होता. या घडामोडींचा संबंध भुजबळांचे नाव वगळण्याशी लावला जात आहे.

About विश्व भारत

Check Also

मुनगंटीवारांचे काय होणार!नवे ‘पीडब्लूडी’ मंत्री कोण? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष

भाजपने सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला असून रवींद्र …

भाजप व दानवेंच्या कट्टर विरोधामुळे सत्तार मंत्री नाही : CM फडणवीस काय म्हणाले?

  मंत्र्यांच्या शपथविधीनंतर चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर नव्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक देखील पार पडली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *