Breaking News

हायकोर्टाने केले न्यायाधीशाला निलंबित

Advertisements

न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उरण न्यायालयाचे दुसरे सहन्यायाधीश विकास दत्तात्रेय बडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होताच गेल्याच आठवड्यात त्यांची बुलढाण्यातील मोताळा येथील न्यायालयात बदली करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांचा कारभार न्या. एस.एस. गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे आदेश मोताळा न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी बजावले आहेत.

Advertisements

 

न्या. विकास बडे यांच्याविरोधात उरण बार असोसिएशनने रायगड जिल्हा प्रमुख न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या तपशिलासह लेखी अर्ज दिल्याने त्याची दखल घेत न्या. राजंदेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे माहिती पाठविली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या बदलीचे तातडीने आदेश काढून उरणहून बुलढाण्यातील मोताळा येथे दुसरे सहन्यायाधीशपदी तडकाफडकी बदली केली होती. दरम्यान, आठवडाभरातच मुंबई उच्च न्यायालयाने न्या. बडे यांना निलंबित केले आहे. मोताळा न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी बडे यांना निलंबित करून त्यांच्याकडील कारभार न्या. एस.एस. गायकवाड यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisements

 

न्या. बडे यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मोताळा मुख्य न्यायालयात कार्यरत राहावे लागणार आहे. त्यांच्याकडे प्रशासकीय कामकाज असण्याची शक्यता आहे. चौकशीचा निकाल लागेपर्यंत सरकार त्यांना अर्धपगारावर राबवणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *