Breaking News

उपचारादरम्यान वाघाला आला “हार्टअटॅक”!

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, देवलापार वनपरिक्षेत्रातून उपचारासाठी आणलेल्या वाघिणीच्या बछड्याचा उपचारादरम्यान ‘हार्टअटॅक’ने मृत्यू झाला. मरणासन्न अवस्थेतील या बछड्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात आणले होते.माणसाला ‘हार्टअटॅक’ येतोच, पण आता प्राण्यांना देखील ‘हार्टअटॅक’ येत असल्याचे समोर येत आहे. विशेषकरुन वाघांमध्ये हा आजार वाढत चालला आहे. नागपूर जिल्ह्यातच अशी अनेक उदाहरणे अलीकडच्या काही वर्षात आढळून आली आहेत. २०२२ मध्ये नागपूर जिल्ह्यातील हिंगणा वनपरिक्षेत्रात नेरी मानकर नियत वनक्षेत्रात एका नाल्यामध्ये वाघीण मृताअवस्थेत आढळून आली. मृत वाघीण ही तीन ते चार वर्षांची होती. हिंगणा वनपरिक्षेत्राचे कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना उपक्षेत्र उमरी (वाघ) येथील चंकापुर नाल्यात वाघीणीचे शव दिसून दिसून आले. शवविच्छेदनादरम्यान वाघिणीला ‘हार्टअटॅक’ आल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर गोरेवाडा बचाव केंद्रात देखील हा प्रकार आढळून आला.

Advertisements

 

Advertisements

चंद्रपूर येथून जेरबंद करुन आणलेला वाघ वेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आला होता. मात्र, त्याच्या आजूबाजूच्या पिंजऱ्यात असलेल्या वाघांनी डरकाळी फोडली आणि ‘हार्टअटॅक’ येऊन या वाघाचा मृत्यू झाला. याशिवाय हैद्राबादच्या प्राणीसंग्रहालयात देखील वाघिणीचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू झाला. तर आता वनखात्याच्याच ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात जखमी झालेला, पण बरा होत असतानाच ‘हार्टअटॅक’ आल्यामुळे वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. जानेवारीपासूनच या बछड्यावर उपचार सुरू होते आणि उपचाराला प्रतिसाद देखील मिळत होता. मात्र, बुधवारी या बछड्याची तब्येत अचानक खालावली. शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. गौतम भोजने, डॉ. विनोद धूत यांच्या मार्गदर्शनात डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. प्रियल चौरागडे यांनी उपचार सुरू केले. मात्र, गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानक कार्यपद्धतीनुसार डॉ. विनोद धूत, डॉ. प्रशांत साेनकुसरे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी टेंभूर्णे, डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. प्रियल चौरागडे यांनी शवविच्छेदन केले. वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सर्व नमुने पुढील तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. यावेळी प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, विभागीय वनाधिकारी प्रीतमसिंह कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक यश काळे, सहाय्यक वनसंरक्षक पांडुरंग पाखले, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते तसेच ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राची चमू उपस्थित होती.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *