जीवन रक्षक दलच्या स्वयम् सेवकांनी सज्ज रहा:दिलीप मेश्रामचे प्रतिपादन
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
पारशीवणी। महाराष्ट्रातील सर्व जिवन रक्षक दल चे स्वयम् सेवकांना आवाहन करण्यात येत आहे की, आता पावसाळा सुरू झाला आहे. कधीतरी मेघगर्जना पडेल यासाठी आपण दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सज्ज राहण्याचे आवाहन जिवन रक्षक दल चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील तमाम शाखा जिथे तिथे आहे त्या स्वयम् सेवकांनी पोलीस विभाग, तहसील विभाग व अन्य शासकीय विभाग यांच्या नेतृत्वात नदी काठावर वसलेले नागरीक, पूरग्रस्त भागातील जनतेच्या हितासाठी आपण सहकार्य करावे. ठिकठिकाणी पर्यटक लहान मोठे तलाव व अन्य ठिकाणी आपल्या कुटुंबीयासह मनोरंजन करण्यासाठी जातात. अशावेळी तरुण युवा पिढीला पोहण्याचा छंद असतो. अशावेळी कोणतीही दुर्घटना घडल्यास आपण त्यांना निःस्वार्थ कार्याने सेवा देण्यात जिवन रक्षक दल सेवा देतात.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे अशा वेळी पाऊस आज नाही तर उद्या पडेल हे नीच्छित आहे. आपण आपल्या प्रक्रियांद्वारे पूरग्रस्त भागातील जनतेच्या हितासाठी नेहमी प्रयत्नशील राहून गोरगरिब जनतेच्या मदतीसाठी तत्पर राहणे हे आपले कर्तव्य आहे. जिवन रक्षक दल ने मागील अनेल वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.त्याची नोंद शासन दरबारी आहे.
श्री गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन गौराई विसर्जन सह अन्य धार्मिक उत्सव दरम्यान जिवन रक्षक दल च्या कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली. अशा स्वयम् सेवकांना व पोहण्यात पारंगत असणाऱ्या स्वयम् सेवकांना त्यांच्या शैक्षणिक धोरणानुसार शासकीय नौकरी, सामुहिक विमा, नदिपात्रात पोहणारे, व पर्यटक अशा अनेक पर्यटकांना नेहमीच वाचविण्याचे व मृतकाचे प्रेत बाहेर काढण्याचे काम जिवन रक्षक दल चे स्वयम् सेवक नियमित करीत आले आहे. व करत आहे. मात्र त्यांच्यावर शासनाचे दुर्लक्ष होत आहे.ही शोकांतिका आहे.
जिवन रक्षक दल चे स्वयम् सेवकांना त्यांच्या शैक्षणिक धोरणानुसार शासकीय नौकरी व पोहण्यात पारंगत असणाऱ्या प्रत्येक स्वयम् सेवकांना साहित्य वाटप देण्यात येण्याची मागणी संबंधीत विभागाकडे जिवन रक्षक दल चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांनी केली आहे