महाराष्ट्रातील कलाल कलार समाजाच्या उन्नतीसाठी सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.याच अनुषंगाने दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ ला शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री श्री शंभूराज देसाई यांना महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या वतीने मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदनाच्या माध्यमातून त्यांना विनंती करण्यात आली की, महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना गेल्या चार वर्षांपासून समाजाकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे या उद्देशाने प्रयत्नशील आहे.परंतु सरकारने कलाल-कलार समाजाकरीता भगवान सहस्त्रार्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या बाबतीत अजुनपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.याकरीता संघटनेच्या माध्यमातून शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री श्री शंभूराज देसाई यांना विनंती करण्यात आली की, शिवसेनेच्या माध्यमातून कलाल-कलार समाजाकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या उद्देशाने आपण प्रयत्न करावे अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून शिवसेना नेते श्री शंभूराज देसाई यांना करण्यात आली.त्याचप्रमाणे समाजाला पारंपरिक मद्य व्यवसाय देण्यात यावा व लाडवाणी शाखेला कलाल २५४ मध्ये समाविष्ट करण्यात यावे इत्यादी विविध मागण्यांच्या संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजांच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी भगवान सहस्त्रार्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने आपण सरकारच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी समाजाच्या वतीने माननीय मंत्री महोदयांकडे मागणी करण्यात आली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष सागर समुद्रवार,राज्य प्रवक्ता रमेश लांजेवार, सरचिटणीस संतोष खंबलवार, कार्याध्यक्ष रविंद्र हटवार प्रामुख्याने उपस्थित होते.
विनित
रमेश लांजेवार
(राज्य प्रवक्ता)
महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
विश्वभारत News Website