Breaking News

EVM मध्ये छेडछाड केल्याने तहसीलदारांना निलंबित करा

Advertisements

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोनिका कांबळे यांची याप्रकरणी बदली करण्यात आल्याची माहिती कळताच सालेकसातील भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्षांनी एकमत करत सालेकसा तहसील कार्यालयावर आज गुरुवारी धडक मोर्चा काढला. सालेकसा नगरपंचायतच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि या प्रकरणात गुंतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे बदली नको तर निलंबन हवे, अशी माागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाला चुकीची रिपोर्टिंग केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन राज्य निवडणूक आयोगाच्या नावे सालेकसा चे तहसीलदार कोंडगुर्ले यांना देण्यात आले.

Advertisements

 

Advertisements

संदर्भिय तक्रार अर्जान्वये निवडणूक निर्णय अधिकारी नगर पंचायत सालेकसा यांनी २ डिसेंबर रोजी कुणालाही विश्वासात न घेता मतपेट्यांचे सील उघडले या विरोधात ३ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यत तहसिल कार्यालय सालेकसा येथे भाजपा वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी ठिय्या मांडला होता. या प्रकरणी कुठलेही दोषी विरोधात कार्यवाही झालेली नसुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. नाईलाजास्तव जनता,मतदाता,उमेदवार व सर्वपक्ष मिळुन खालील मागण्यांची पुर्तता होयपर्यंत आंदोलन जास्त तिव्र करण्याचे निर्णय केले आहे आणि यास पूर्णपणे शासन प्रशासन जवाबदार राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

 

सालेकसा नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी विरोधात सालेकसा तहसील कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये या प्रकरणी दोषींना तात्काळ निलंबित करण्यात यावे. निवडणूक प्रक्रियेच्या आरंभापासून आजपर्यत चे उपविभागीय अधिकारी देवरी तहसिलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कांबळे यांचे सर्व मोबाईल फोन डाटाचे सीडीआर तपासण्यात यावे. निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे आणि प्रमोद कांबळे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. उपविभागीय अधिकारी देवरी यांनी खोटा अहवाल सादर करुन निर्वाचन आयोगाची दिशाभूल व आदर्श आचार संहितेचा भंग केल्याने यांना ही निलंबित करण्यात यावे. सदर मागण्या तात्काळ मंजूर कराव्या. या प्रकरणावरुन कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला जवाबदार असणारे दोषी यांच्यावर कार्यवाही न झाल्यास जनक्षोभ आणि इतर बाबींना निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आपण जवाबदार असणार असल्याचे ही साले कसा तहसीलदार कोंडागुर्ले यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

 

सदर निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी गोंदिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया यांनाही देण्यात आलेली आहे. गुरुवार 4 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व सालेकसा काँग्रेस पक्षाचे बबलू कटरे, राजू दोनोळे, जितू बल्लारे , सीताराम हेमणे यांनी केले. याप्रसंगी हजारोच्या संख्येने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व सामान्य जनता या मोर्चात उपस्थित होती.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

राज्यातील रस्त्यांची कामे ठप्प : कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन सुरु

राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही शासकीय कामांची दीड वर्ष झाली तरी थकीत दयेके मिळत नसल्याने …

कंत्राटदार ७ एप्रिलपासून कामबंद करणार : फडणवीस सरकारवर रोष

जिल्हा पातळीवर केलेल्या शासकीय कामांची देयके गेली १६ महिने मिळत नसल्याने राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी ७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *